रहस्यमय हॅलोवीन
अंतराळवीरांनी चंद्रावर जेंव्हा पहिले पाउल
ठेवले तेंव्हा त्यांना जो आनंद झाला असेल तेव्हढा किंवा त्यापेक्षा जरा जास्तच
आनंद झाला होता, जेंव्हा आम्ही अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ( विमानातून उतरल्यावर ) ठेवले तेंव्हा. साहजिकच होते.
ऐकलेल्या आणि सिनेमात पाहिलेल्या, बातम्यात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष पाहणार
होतो. त्यामुळे कमालीची उत्सुकता होती, कुतूहल होते. विमानतळावरून घरी पोहोचायला
कमीत कमी १०० च्या स्पीड ने एक दीड तास
लागणार होता. अमुक एका अव्हेन्यू कडे जाण्यास हायवे वरील रस्त्याला नंबर दिले
होते. ज्या भागात जायचे आहे त्या भागाचा नंबर माहिती हवा आणि अर्थात शहराचा भूगोलही
माहिती हवा, घरी जाताना मोठ्या इमारती, रस्ते, शिस्तीत जाणाऱ्या मोटारी, अटलांटा
विमानतळावरचे प्रचंड मोठे पार्किंग, विमानतळावरचा प्रवेश किंवा निकास (exit) फी, पेट्रोल पंप, पार्किंग फी, हे सगळे रोकड विरहित
व्यवहार ( cashless) ,सगळीकडे cardने व्यवहार .पैसे सांभाळण्याचे अजिबात टेन्शन
नाही. केव्हढा रिलीफ वाटला.
गाडी कॉलनीत
शिरली .कॉलनी कसली हो? नंदनवनच वाटले. शिरल्यापासून अगदी आत टोकापर्यंत च्या परिसरातील, घरांप्रमाणेच घराबाहेरील चढ-उतारावरील
कटिंग केलेली लॉन्स, कटिंग केलेली लहान मोठी झाडे, झुडुपे, रस्त्याशेजारील फूटपाथ सगळं
सगळं नीट नेटकं. एखाद्या चित्रकाराने काढलेल्या निसर्ग चित्रापेक्षाही सुंदर.
गॅरेज मध्ये
गाडी विसावली, त्याच दाराने आम्ही घरांत प्रवेश केला. आत गेल्यावर ही जाहिरात आहे
का घर? असे वाटावे. मात्र संपूर्ण रस्त्यांवर घरी येईपर्यंत कुठलीही जाहिरात बाजी.
बोर्ड, होर्डींग्स, साइन्स चे दर्शन नाही. वास्तविक ट्रम्प आणि हिलरी यांच्या
निवडणुकीच्या जाहिराती तरी नक्की दिसतील असे वाटले होते. ते पण नाही.
अत्यंत घाईत
ठरविलेल्या अमेरिका वारीचे नियोजन आम्ही, बहिण आणि मेव्हणे यांच्यावरच सोपविले
होते. कमीत कमी वेळात, सर्व सांभाळून जास्तीत जास्त वेळेचा सदुपयोग आणि समाधान कसे
देता येईल याचा, कष्ट घेऊन त्यांनी विचार केला होता आणि नियोजन सुद्धा. विश्रांती
नंतरचा पहिला दिवस उजाडला. अजून औत्सुक्य संपले नव्हते. अनिता (माझी बहिण) म्हणाली
चला चक्कर मारून येऊ. अक्षरधाम पाहून येऊ. नवे हिंदू टेम्पल झाले आहे. इथेही
मंदिरेच पहायची? मुलांचा कडवट चेहरा. पण निघालो. अप्रतिम मंदिर व परिसर पाहून, बाहेरच
असलेल्या दुकानात शिरलो. आमच्या पाठोपाठच आत शिरलेल्या व्यक्तीने आम्हाला विचारले आपण याआधी भेटलोय कुठेतरी. आम्ही भारतातून आलो आहोत, हे सांगितल्यावर मग
हिंदीतून संवाद सुरु झाला बराच वेळ तो चालला. या प्रसंगाने आम्हीही सुखावलो होतो
हे खरे. भारतीय असल्याची ओढ आणि एकमेकांविषयी वाटणारे प्रेम.. दुसरे काय? दिवाळीत होणाऱ्या महाप्रसादाला
येण्याचे निमंत्रण घेऊन बाहेर पडलो.
मुख्य रस्त्याला लागलो. पुढेच नर्सरी होती. अनिताला लॉन कापणा-या माळ्याला भेटायचे होते आणि पम्पकिन पहायचे होते. पम्पकिन भाजीवाल्याकडे न घेता नर्सरीत कशाला घेते ? असा प्रश्न मला पडला होता. एखाद्या मॉल ची एन्ट्री वाटावी असे त्या फॅमिली नर्सरी चे प्रवेश दार होते. आत शिरल्यावर इनडोअर आणि आउटडोअर सजावटीच्या वस्तू, आणि बरेच काही लक्ष वेधून घेत होते. मला आपल्याकडील दिवाळीच्या तयारीची आठवण होत होती.कुंभार वाडा आठवला,विविध आकाराच्या पणत्या,दिवे,मूर्ती ,किल्ल्यावरची मातीची खेळणी, किल्ल्याच्या प्रतिकृती, रांगोळ्या, लक्ष्मी पूजनाची तयारी यांची एव्हाना सर्व दुकानं थाटली असतील. उत्सवाचे वातावरण,प्रफुल्लीत करणारे! तशीच कुणकुण इथेही लागली .काहीतरी, इथला सण असणार. नर्सरीत पम्पकिन खरेदी करण्याला काहीतरी संदर्भ नक्की असणार.
मुख्य रस्त्याला लागलो. पुढेच नर्सरी होती. अनिताला लॉन कापणा-या माळ्याला भेटायचे होते आणि पम्पकिन पहायचे होते. पम्पकिन भाजीवाल्याकडे न घेता नर्सरीत कशाला घेते ? असा प्रश्न मला पडला होता. एखाद्या मॉल ची एन्ट्री वाटावी असे त्या फॅमिली नर्सरी चे प्रवेश दार होते. आत शिरल्यावर इनडोअर आणि आउटडोअर सजावटीच्या वस्तू, आणि बरेच काही लक्ष वेधून घेत होते. मला आपल्याकडील दिवाळीच्या तयारीची आठवण होत होती.कुंभार वाडा आठवला,विविध आकाराच्या पणत्या,दिवे,मूर्ती ,किल्ल्यावरची मातीची खेळणी, किल्ल्याच्या प्रतिकृती, रांगोळ्या, लक्ष्मी पूजनाची तयारी यांची एव्हाना सर्व दुकानं थाटली असतील. उत्सवाचे वातावरण,प्रफुल्लीत करणारे! तशीच कुणकुण इथेही लागली .काहीतरी, इथला सण असणार. नर्सरीत पम्पकिन खरेदी करण्याला काहीतरी संदर्भ नक्की असणार.
आतमध्ये गेलो, भोपळ्यांचे कितीतरी प्रकार. मला दोन तीनच प्रकार माहिती होते. लहानात लहान आकारापासून ते मोठ्यात मोठ्या आकाराचे असे इथे भोपळ्यांचे पीकच आले होते. नुकतीच कापणी झाल्यासारखे. म्हटलं, असेल ह्यांचा बैसाखी, ओणम सारखा हार्वेस्ट फेस्टिवल. विविध आकाराचे भोपळे,भोपळ्याच्या आकाराचे प्लास्टिक चे कंदील, भयानक मुखवटे, वटवाघळे, काळ्या मांजरी, कोळी, कोळीष्टके, हाडांचे सापळे, भीतीदायक मुखवटे, अॅक्सेसरीज, अशा अनेक वस्तूंनी या नर्सरी बरोबरच इतर दुकाने, ऑफिसेस, फार्मर्स मार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल,रंगीबेरंगी सजली होती.ऑक्टोबर महिन्यात इथे हॅलोवीन साजरा होणार होता.त्याची पूर्वतयारी महिनाभर आधी सुरु झाली होती.हळू हळू आम्हाला हॅलोवीन ची सजावटही पाहायला मिळणार होती.
मधल्या काळात आमचे फिरणे ,स्थलदर्शन चालू होते.जिथे जिथे जात होतो, तिथे तिथे पम्पकिन काही पाठ सोडत नव्हते. सुंदर सजावटी दिसत होत्या. नासा मध्ये सुद्धा होती. न्यूयॉर्क चे The Met अर्थात, दी मेट्रोपोलीटन म्यूझीयम, मोमा, नायगरा, फिलाडेल्फिया, मॅनहटन, सार्वजनिक ठिकाणे. इथेही हॅलोवीन च्या सांस्कृतिक खुणांचे दर्शन होत होते.
जाता- येता, घरा बाहेर, अंगणात अक्राळविक्राळ, मुखवटे, भुते, हाडांचे सांगाडे अशा भीतीदायक सजावटी केल्या होत्या. कुणाच्या अंगणात पम्पकिन च्या सजावटी, लक्ष वेधून घेत होते, पण भीती वाटत होती ते बघताना. काही घराबाहेर तर लाईट इफेक्ट्स, हॉरर संगीत,फ्युम,बापरे !
इकडे आमची दिवाळीची तयारी जोरात सुरु होती. आकाशकंदील. लाईट च्या माळा,पणत्या लावून दिव्यांच्या उत्सवाची तयारी.३१ ला दिवाळी पडावा, आमचा प्रकाशाचा उत्सव आणि ३१ ऑक्टोबर ला यांचा हॅलोवीन . दोन्ही टोकाचे विसंगत वाटत होते.
बालगोपाळांची ‘ट्रिक ऑर ट्रीट’
दिवेलागणीची वेळ झाली ,बाहेर लहान लहान मुले त्यांच्या पालकांसह ,विविध वेशभूषेत घरोघरी जात होती. परीकथेतील राजकुमारी, नायक, ममी, ड्रॅक्युला, चेटकीण, हॅरी पॉटर यांचे वेश घालून, हातात भोपळ्याच्या आकाराच्या बादल्या, बास्केट्स घेऊन जात होती.बाहेर हे काय वातावरण आहे हे पाहायला आम्ही कॉलनीत एक चक्कर मारली.घरात पण मुलांसाठी चॉकलेट ,खाऊ ची तयारी झाली होती.ते पाहून मला संक्रांत आणि दसरा आठवला आणि लहानपण आठवल.तेंव्हा ही मुले घरोघरी जाऊन ‘ट्रिक ऑर ट्रीट’? असे ओरडत, खाऊ देणार कि घाबरवू? आणि खाऊ, भेटवस्तू घेऊन जातात. हॅलोवीन च्या कॉस्च्युम्स ची आणि पार्टीची लहान मोठे आतुरतेने वाट पाहत असतात.हा हॅलोवीन चा एक प्रकार.याशिवाय घोस्ट टुर्स आयोजित करतात. कॉस्चुम पार्टी, हॉंटेड हाउसला भेट, हॉरर स्टोरी सांगणे, हॉरर फिल्म पहाणे हे उत्सव साजरे करण्याचे प्रकार .
हॅलोविन पाककृती
या सणा निमित्त कैंडी अॅपल, पीनट बटर बॉल्स, ओवन कॅरॅमल कॉर्न अणि भोपळ्याचे ब्रेड, स्वीट्स यांचा आस्वाद घेतला जातो.
हॅलोविन चे मूळ ब्रिटन अणि आयर्लंड संस्कृतीत सापडतात.त्यांच्याकडे नोहेम्बर महिन्याचा पहिला दिवस हा नविन वर्षाचा दिवस मनला जाई अणि उन्हाळ्याचा शेवटचा दिवस.ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत पशुपालन, शेतीची बरीचशी कामे उरकली जात. थंडी सुरु होणार.खरे तर ऋतू बदलाची जाणीव करून देणारा हा सण.हार्वेस्ट फेस्टिवल, जगात ही कल्पना सगळीकडे सारखीच. नवीन पीक हाती आलं आहे त्यामुळे या समृद्धीने आनंदोत्सव साजरा करतात ही तर परंपराच आहे .
हॅलोविन या
शब्दाचा पहिला वापर सोळाव्या शतकात केला गेला, जो स्कॉटीश संस्कृतीची ओळख देतो. केल्ट
आय सी मध्ये हा सण म्हणून साजरा करतात.तो नववर्षाभिनंदन म्हणूनच.त्यामुळे नवे वर्ष
संतांचा दिवस/संन्यासी दिवस असेल, या दिवशी संत पद मिळालेल्या व न मिळालेल्या सर्व
संतांचे स्मरण केले जाते.त्याला आल हॉलोज डे किंवा होली डे म्हणतात. तर त्याचा आधला
दिवस हा, वर्षभरात कुटुंबातले जे कोणी निधन पावले असतील त्यांना शांत करण्याचा दिवस.
त्या रात्री मृतात्मे येतात, ते या दिवशी नव्या शरीराच्या शोधात येतात व मर्त्य
मानवाच्या जगात सहज प्रवेश करतात असा समज होता.त्यातले दुष्ट आत्मे आपल्यावर प्रभावी ठरू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी
व आपल्या घरापासून पळवून त्यांना लावण्यासाठी घराबाहेर स्मशानरूपी सजावट करण्याची
प्रथा हॅलोवीन सणाला आहे. इथे मला आपली भारतीय संस्कृती आठवली .पितृ पंधरवडा.आपणही
पंधरा दिवस आपल्या पितरांच्या आठवणीप्रीत्यर्थ राखून ठेवतो. आवश्यक ते विधी करतो. आपल्या
परंपरेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हॅलोवीन म्हणजे सर्वपित्री अमावास्याच
म्हणावी नाही का?
इसवि सनानंतर पहिल्या शतकात रोमन साम्राज्यात पोमोना या फळझाडाची रोमन देवतेची पूजा करण्यासाठी हा सण साजरा होऊ लागला. अॅपल बॉबिंग हा हॅलोवीन चा खेळ प्रसिध्द आहे.
आयर्लंड मधून
अमेरिकेत आलेल्या विस्थापितांनी हा सण अमेरिकेत आणला. अमेरिका कॅनडा, पोर्तोरिको, आयर्लंड,ब्रिटन
मध्ये हा सण साजरा केला जातो.
अमेरिकेतले हॅलोवीन चे वैशिष्ट्य म्हणजे jack o Lantern, भोपळ्याचा तयार केलेला भला मोठा कंदील. भोपळ्याला मानवी डोक्याचा आकार देऊन, त्यावर नाक, डोळे, तोंड कोरून, मुखवटा तयार केला जातो. ३१ ऑक्टोबरला रात्री भोपळ्यात मेणबत्ती लावून तो कन्दिलासारखा मुख्य दाराबाहेर ठेवला जातो. जक या अत्यंत हुशार पण आळशी आयरिश माणसाची कथा या ‘jack o Lantern’ शी जोडलेली आहे. दुष्ट प्रवृत्ती /आत्मे भोपळ्यामुळे दूरच राहतात अशी श्रद्धा आहे.
अमेरिकेतले हॅलोवीन चे वैशिष्ट्य म्हणजे jack o Lantern, भोपळ्याचा तयार केलेला भला मोठा कंदील. भोपळ्याला मानवी डोक्याचा आकार देऊन, त्यावर नाक, डोळे, तोंड कोरून, मुखवटा तयार केला जातो. ३१ ऑक्टोबरला रात्री भोपळ्यात मेणबत्ती लावून तो कन्दिलासारखा मुख्य दाराबाहेर ठेवला जातो. जक या अत्यंत हुशार पण आळशी आयरिश माणसाची कथा या ‘jack o Lantern’ शी जोडलेली आहे. दुष्ट प्रवृत्ती /आत्मे भोपळ्यामुळे दूरच राहतात अशी श्रद्धा आहे.
अशा या हॅलोवीन
ची मजा गेल्या वर्षी अमेरिकेत अनुभवली आणि त्या मागचे रहस्य पण उलगडले. आज ३१
ऑक्टोबर म्हणून आठवण आली.
हा सण साजऱ्या करणाऱ्या समस्त बांधवाना Happy Halloween / शुभेच्छा!
-- डॉ.नयना
कासखेडीकर