प्रजाहितदक्ष अहिल्याबाई होळकर
जगाच्या इतिहासात उत्कृष्ट प्रशासिका म्हणून नोंद घेतली गेलेल्या
अहिल्याबाई होळकर . नगर जिल्ह्यात, जमखेड तालुक्यातील चौंडी गावच्या माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई
शिंदे यांचे कन्यारत्न.
अठराव्या
शतकातील, २८ वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्या
मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी
अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्ती म्हणजे अहिल्यादेवी . अहिल्यादेवी यांचा राज्याचा
काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या
इतिहासातले सोनेरी पान. सर्वसामान्य कुटुंबातली अहिल्या एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामींनी
झाल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची जागा सुनेला, अहिल्येला देणारे मल्हारराव होळकर ( इंदूरच्या होळकर घराण्याचे संस्थापक
) घराण्याचा वंशाचा दिवा मुलगाच हे मानण्याच्या काळात एक स्त्री असूनही,आपला पुत्र खंडेराव याचे निधन झाल्यानंतर, अहिल्या
जेंव्हा सती जाण्यास निघाली, तेंव्हा मल्हार राव म्हणाले, “खंडूच्या अपमृत्यूमुळे मी
निर्जीव झालो आहे.आता तूही मला सोडून जाणार? आता माझा पुत्र
होण्याचे सोडून कुठे निघलीस? माला अनाथ करून जाऊ नकोस पोरी.
तूच माझा खंडू आहेस. हे राज्य तुझेच आहे. जीव द्यायचाच तर या प्रजेसाठी दे. या
प्रजेची आई हो”.आणि अहिल्येने त्याच क्षणी
आपले अलंकार, वस्त्र रंग, उपभोग हे
सर्व चितेत टाकले आणि आणि यापुढे फक्त शुभ्र वस्त्रे नेसेन आणि पुढचे आयुष्य
प्रजेसाठी आणि राज्यासाठी देईन,” अशी शपथ घेतली. एक अनमोल
रत्न चितेत जाण्यापासून आपण वाचवले याचे मल्हाररावांना त्या दु:खी प्रसंगातही
समाधान झाले . विधवा झालेल्या सुनेला मुलाच्या जागी राजपदाची सूत्रे बहाल केली.
तेंव्हा पासून मल्हार रावांनी पण अहिल्येला एकेरी हाक मारणे बंद केले.
सुरुवातीपासूनच मल्हाररावांनी अहिल्ये
मधील जात्याच विशेष गुण ओळखून तिला शिक्षण देण्यास गुरु नेमले. गणित, इतिहास, भूगोल अशा सर्व
विषयांचे ज्ञान तिला मिळत होते. लवकरच ती हिशोब करू लागली. घोडेस्वारी शिकली.
रामायण, महाभारत व महत्वाचे ग्रंथ वाचून संपवले. राज्यकरभारातील
हिशोब करावेत, पत्रे पाठवावित, फौजा
तयार कराव्यात, वसूली जमा करावी, खातेनिहाय
पैसे वाटप करावेत, गोलाबारूद, ढाल
तलवारी सारखे साहित्य सज्जा करावे, अशा प्रकारे अहिल्या मल्हारराव
सांगतील तसे धडे गिरवीत होती. अनुभव घेत होती आणि तिची कुशलता वाढत होती.राज्य
कारभाराचे सर्व पदर मल्हार रावांनी अहिल्येला शिकविले होते. त्यातल्या खाचा खोचा
शिकवल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर पैशांचे हिशोब, वेगवेगळे राजकीय संबंध या बद्दल दोघात सल्ला मसलत,
चर्चा होत असत. मल्हार राव आणि अहिल्याबाई यांना एकमेकांबद्दल आदर होता विश्वास
होता. त्यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्याबाई थोडा फार कारभार बघत होत्या.
अनुभवाने शिकत होत्या. काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर तिथल्या तिथे मल्हार राव
स्पष्ट पणे दुरूस्ती करून काय योग्य काय अयोग्य हे सांगत. मल्हार राव आणि गौतमाबाई
अहिल्येच्या पाठीशी सर्वार्थाने खंबीरपणे उभे राहिले.
मल्हारराव मोहिमेवर गेले की सर्व कारभार
अहिल्या बघत असे. मल्हाररावांच्या सूचनेनुसार सर्व व्यवस्था करीत असत. हिंदुस्थानात
अब्दालीच्या करामतींच्या बातम्या कानवर येत होत्या. त्याने मथुरा वृंदावनात
मुंडक्यांच्या राशी घातल्या, हे कळल्यावर त्यांनी ठरविले की, हिंदूंना आता
चिरेबंद आश्रयस्थाने हवीत . त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधून घेतल्या.
राजकारण करता करता एकाच वेळी ब्रिटिश
चोहोबाजूंनी वाढत असता, आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती
टिकवण्याचे प्रयत्न करत होत्या. राज्यात पाणी पुरवठा सुधारणा घडवल्या. त्यांनी
अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या,
चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास
करणार्या लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे
बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्या बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
पुलांचे बांधकाम, रस्ते निर्मिती,
रस्ते दुरूस्ती, डाक व्यवस्था,रायते
साथी शिक्षणाची व्यवस्था ग्रंथ संग्रह व ग्रंथ निर्मिती,
आरोग्यासाठी दवाखाने , औषधी बागा,
शेतीसाठी सिंचना सोयी, जमीनिसाठी ९\
११चा कायदा ,माळरानावर
वृक्षलागवड आरक्षित गयरान , करप्रणाली ,विद्वान आणि कलाकार यांना राजाश्रय अशा अनेक गोष्टी केल्या .
त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यन्त्च
मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी,ते
द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची
कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात
कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही
सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या
गुणामुळेच.माणसांबरोबरच पशू, पक्षी,
प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या,
वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, एव्हढेच काय मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे अन्नदान
करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत.
त्यांच्याकडे
दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथसंग्रह होता. विद्वान आणि कलावंत यांची त्या कदर करीत, योग्य तो मानसन्मान देत.तीर्थ
क्षेत्रांच्या ठिकाणी इतर प्रांतातील शास्त्री, पंडित , वैद्य व वैदिक यांना आणून,राहण्याची सोय करून
त्यांनी एक प्रकारे ज्ञान संवर्धन व संरक्षण केले. उदा. काशी येथील ब्रह्मपुरी,
लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावेत म्हणून
योग्य ते धोरण त्यांनी आखले होते. राज्यकारभार चालवताना त्यांनी जनतेच्या अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीबरोबरच, समता शांतता, बंधुता, न्याय, विचार
स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मुल्यांची जपणूक त्यांच्या काळात झालेली दिसते.
अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा ,प्रजाहित
दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन
झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या
सासर्यांचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात
अजरामर केले.(हा लेख विश्व संवाद केंद्राने 5 ऑक्टोबर 24 रोजी प्रसिद्ध केला.)
---- डॉ. नयना कासखेडीकर ,पुणे .
------------------------------------
No comments:
Post a Comment