‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील
घटना-घडामोडींचा,प्रसंगांचाआढावा घेणारे सदर
विचार - पुष्प ,भाग १२
संगीत -१
महाविद्यालयात
शिकत असताना गंभीर विषयावरील ग्रंथ वाचनाच्या खालोखाल नरेंद्रच्या आयुष्यात स्थान
होतं ते संगीताला. तो स्वत: संगीताचा आनंद घेत असे आणि इतरांनाही तो तेव्हढ्याच
मुक्तपणे देत असे. अनेक वेळा मित्र जेंव्हा आग्रह करत असत तेंव्हा, नरेंद्र लगेच प्रतिसाद देत असे. त्याचा सूर लागला की सगळीकडे
निस्तब्ध शांतता पसरून त्या स्वरमाधुर्यात सगळेजण डुंबून जात.
तीव्र बुद्धिमत्तेबरोबर रसिकता आणि अभिजात अभिरुची हे गुण असल्यानेच युवावस्थेत येता येताच नरेंद्रने गायन वादन कौशल्य आत्मसात केले होते आणि कुटुंबातही याची ख्याती पसरु लागली. त्याच्या धीरगंभीर आणि सुरेल आवाजाने लोक आकर्षित होत. “स्वरांच्या माध्यमातून त्यातील सौंदर्याच्या आविष्कारा बरोबरच रसिक श्रोत्यांच्या मनात विशिष्ट भाव निर्माण झाला पाहिजे. श्रोत्यांची आणि स्वत: गायकाची अशी भावसमाधी लागणे, गायनाचे सूर थांबल्यावरही तिचा परिणाम श्रोत्यांच्या मनात रेंगाळत राहणे आणि त्यांचे मन एका उदात्त वातावरणात पोहोचणे हे संगीताचे खरे उद्दीष्ट आहे” असे नरेंद्रचे मत होते. त्यांचा हा व्यासंग केवळ मैफिली पुरताच मर्यादित नव्हता.
श्री रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र ची पहिली भेट झाली त्याचं कारण, नरेंद्रचं गाणं हेच होतं. नरेंद्रचं संगीत हेच या दोघांच्या मधल्या अतूट संबंधांचा सेतू होता.(यातील फोटो,पुस्तक आणि इंटरनेटवरुन घेतले आहेत.साभार परत )
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You
Tube च्या
या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा.
अभिनव उपक्रम आहे
ReplyDelete