'विचार पुष्प' भाग- २
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ---
खरे शिक्षण
मुलांना कोणत्या शाळेत घालायचं
हा मोठा प्रश्न आजच्या पालकांसमोर असतो. खरय की शिक्षण आपल्या आयुष्यातला महत्वाचा
घटक असतो. शिक्षण हे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हीही . औपचारिक शिक्षण म्हणजे
शालेय , महाविद्यालयीन,
पुस्तकी शिक्षण, तर अनौपचारिक शिक्षण म्हणजे घरात कुटुंबात,बाहेर
समाजात, आजूबाजूला घडणार्य घटना यातून मिळालेले शिक्षण व
मोठ्यांनी केलेले संस्कार सुद्धा. शाळेत
घेतलेले पाठ्यपुस्तकांतले शिक्षण म्हणजे निव्वळ माहिती असते. ब्रिटीशांनी घालून दिलेल्या या शिक्षण
पद्धतीमुळे आपल्या देशात जीवनमूल्ये शिकवणार्या, व्यवहारज्ञान
शिकविणार्या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. शिक्षण क्षेत्रातली आजची स्थिति
बघता स्वार्थ आणि मानवी मूल्यांची घसरण याच वरचढ होत आहेत.
हे तर स्वामी
विवेकानंदांना तेंव्हाच कळलं होत. त्यांचाही या शिक्षण पद्धतीला विरोध होता.
शिक्षणविषयी त्यांची मते आजही डोळे
उघडणारी आहेत. ते म्हणतात, “ आपल्याला जीवन घडविणारे, माणूस निर्माण करणारे, व चांगले विचार आत्मसात करविणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही जर चार पाच
विचार आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरविलेत तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत
करणार्या व्यक्तिपेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल. जे शिक्षण सामान्य लोकांमध्ये
चारित्र्यबल, सेवा, तत्परता आणि साहस
निर्माण करू शकत नाही ते काय कामाचे? यामुळे किल्ली दिलेल्या
यंत्रासारखे तुम्ही राबता. ज्यामुळे सामान्य
माणूस स्वताच्या पायावर उभा राहू शकतो, तेच खरे
शिक्षण. चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण आम्हाला हवे आहे”
हे स्वामी
विवेकानंदांचे विचार आजही तंतोतंत लागू आहेत. आजच्या शिक्षण क्षेत्राला आणि देशाला
पण .आजच्या घडीला भरकटलेला युवक, टंगळमंगळ करुन वेळ वाया घालविणारा युवक, दिशा
नसणारा व ध्येय नसणारा युवक, रस्त्यारस्त्यात, चौकात हास्यविनोद करणारा, छेड छाड करणारा, आंदोलने, मोर्चे यात स्वार्थासाठी व कुणी संगितले
म्हणून सहभागी होणारा युवक उद्याच्या भारताची चिंता आहे.
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ज्यांना ऑडिओ स्वरुपात ऐकायची आहे
त्यांनी You Tube च्या या
लिंकवर जाऊन यू ट्यूब व्हिडिओ बघावा.
No comments:
Post a Comment