‘ विचार – पुष्प ’ भाग ३
बालमानस – १
लहान मुलांचे मानसशास्त्र हा मोठा अभ्यासाचा
विषय आहे. बाल वयात ते आपले आई वडील,
घरातील
लहान मोठे आणि संपर्कातील माणसे यांचे निरिक्षण करीत असतात. ते काय बोलतात ते
नीट ऐकून
मनात साठवत असतात. ते मूल जिज्ञासू असेल तर विचारायलाच नको. कारण या
बालवयात
होणारे संस्कार त्याला आयुष्यभर पुरत असतात.
नरेंद्र असाच सर्वांपेक्षा
वेगळा. त्याला प्रत्येक गोष्टींचे कुतूहल असे. दुपारच्या वेळी कुटुंबातल्या सर्व
स्त्रिया एकत्र जमून रामायण महाभारताचे वाचन करीत असत. त्या कथा नरेंद्रला फार
आवडत, रामायणाच्या तर विशेष आवडत. श्रीराम आणि
सीता यांच्या विषयी तर नरेंद्रच्या मनात अपार श्रद्धा व भक्ति उत्पन्न झाली होती. एव्हढी
की त्यांच्या मूर्ति आणून त्याने खोलीत ठेवल्या आणि त्याची रोज पुजा पण होऊ लागली.
एकदा राम कथेच्या कीर्तनात त्याने ऐकले की हनुमंत केळीच्या वनात असतो. त्या
बालबुद्धीला खरेच वाटले. कीर्तनकारांना त्याने विचारले, की
मला हनुमंत त्या वनात भेटेल का ? कीर्तनकाराने समजूत काढायची म्हणून, हो
म्हटले. आणि नरेंद्र हनुमंताला भेटण्यासाठी त्या केळीच्या वनात गेला, खूप वेळ बसला तरी त्याची भेट झाली नाही. निराश
होऊन तो परत आला आणि आईला संगितले .आईने “ प्रभु रामाचंद्राने काहीतरी काम
सांगितलं असेल म्हणून तो तिकडे गेला असणार अस सांगून बालमनाची समजूत काढली खरी.
आणखी एकदा असाच अनुभव त्याला आला.
त्यांच्याकडे नोकर चाकर होते ते
अदबीने वागत बोलत .प्रेमळ होते ते. त्यांच्या मुलांशी गप्पा ही होत असत. एकदा
नरेंद्रशी बोलत असताना एका नोकराने म्हटले, “विवाह किती वाईट गोष्ट आहे” तर प्रपंचत किती कटू अनुभव येतात
तेही त्याने नरेंद्रला संगितले. या बोलण्याचा नरेंद्रवर इतका खोलवर परिणाम झाला की
त्याल वाटले, राम आणि सीता या देवतांना आपण मानतो. पण
त्यांचा विवाह झाला आहे आणि त्या क्षणीच प्रभू रामचंद्र नरेंद्रच्या मनातून उतरले, त्याने आईकडे धावत जाऊन हे संगितले. पण ती माऊली या बालमानला काय समजवणार? भुवनेश्वरी देवी म्हणल्या. “तू असं कर, श्रीरामांच्या
ऐवजी शिवाची पुजा कर. हे म्हणणे पटले. अर्थातच नरेंद्रला हे माहिती नसावे की शिव
पार्वती यांचा ही विवाह झालेला आहे म्हणून. त्या बालबुद्धीने लगेच वर खोलीत जाऊन राम
-सीतेच्या मूर्ति काढून टाकल्या आणि शिवाची मूर्ती आणून त्याची स्थापना केली. मोठा
होई पर्यन्त शिवाची पुजा चालू होती.
असे घडत असते बालमन. बालवयात मुलांना घडवताना त्यांची जिज्ञासा, त्यांचे कुतूहल पूर्ण करताना आईवडिलांनी
आणि मोठ्यांनी खूप विचारपूर्वक उत्तरे दिली पाहिजेत. आपण स्वताही वागताना नीट
काळजी घेतली पाहिजे.
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ज्यांना ऑडिओ स्वरुपात ऐकायची आहे
त्यांनी You Tube च्या
या
लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा.
No comments:
Post a Comment